नागपूर: नागपूर - काटोल मार्गावरील चिचोली येथे शांतीवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ५०० पेक्षा जास्त वस्तू जपून ठेवण्यात आल्या आहेत. खराब होऊ नये म्हणून त्यांवर रासायनिक प्रक्रिया करण्यात आली आहे. येथे ११ एकर जागेवर संग्रहालय प्रस्तावित आहे, पण राज्य सरकारच्या दुर्लक्षितपणामुळे काम रखडले आहे. आज डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीदिनी तरी सरकारने हे काम मार्गी लावावे, अशी अनुयायांची मागणी असल्याचे शांतीवनचे व्यवस्थापक संजय पाटील यांनी सांगितले.
व्हिडिओ: अतुल मेहेरे
#AmbedkarJayanti2022 #BabasahebAmbedkar #AmbedkarJayanti #Sakal #nagpur #Ambedkarquotes #BhimArmy